रस्त्यावर सापडलेली सोन्याची अंगठी केली परत; दिला प्रामाणिकपणाचा परिचय

  • फैजू बेग यांचा प्रमाणिकपणा
  • स्वतंत्र दिनी रोख व शाल श्रीफळ देऊन सत्कार

कोरपना. जगात आजही माणुसकी  व प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण  कोरपना याशहरात अनुभवाला आले.  कोरपना येथील  प्रतिष्ठित कापूस व्यापारी शांताराम  देरकर यांची सोन्याची अंगठी रस्त्यावर हरवली होती.  हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे फैजु बेग यांना रस्त्यावर ही अंगठी सापडली. याची माहिती त्यांनी मित्र उमेश  लसनते यांना दिली.  दरम्यान देरकर यांची अंगठी हरवल्याची  माहिती यांना कळली. क्षणाचाही विलंब न करता व कुठलाही मोह न ठेवता लगेच फैजु बेग यांनी देरकर यांचे दुकान गाठले. दुकानात शांताराम  देरकर त्यांचे पुत्र सुनील यांनी ती अंगठी लगेच ओळखली. एकीकडे पैशाच्या लोभामुळे लोक एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या घटना नित्याच्या झालेल्या असताना, फैजु बेग यांनी दिलेला प्रामाणिकपणाचा परिचय बरेच काही सांगून जातो.  स्वातंत्र्यदिनी  फैजुबेग व उमेश लसनते यांना माजी सभापती स आबीद अली यांचे हस्ते देरकर परिवाराकडून रोख दहा हजार एक रूपये व  शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी बाजार समीती सचिव कवडू देरकर सर्व कर्मचारी तसेच ॲड. श्रीनिवास मुसळे ॲड. मोहितकर माजी सभापती भारत चन्ने, अनिल रेगुंडवार, नगरसेवक सुभाष तुरणकर, अमोल आसेकर  इत्यादी उपस्थित होते.