आरोग्य विभाग लागली कामाला

सालेकसा,

येथील शारदा नगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतचे पदाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग कामाला लागली आहे.

शहरातील शारदा नगर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळताच तालुक्यात दहशत पसरली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून तालुक्यात वाढू नये यादृष्टीने न.पं.चे अधिकारी अजय वाघमारे, नायब तहसीलदार पितुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे डॉ. वैरागडे, डॉ. गवली, आशा पटले, अंगणवाडी सेविका कंचना गोलीवार, आशा सेविका छलिना साखरे, न.पं. कर्मचारी संतोष गभणे, मानकर हे शरदा नगरात नागरिकांच्या घरोघरी जावून तपासणी करीत आहेत.