पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 355 वर

दिवसभरात 10 नवे पॉझिटिव्ह
13 जणांना डिस्चार्ज

यवतमाळ,

गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. बुधवारी दिवसभरात 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले 13 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत 355 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील तीन महिला आणि तीन पुरुष असे सहा जण आहे. तसेच नेर तालुक्यातील सिंदखेड येथील एक पुरुष आणि नेर शहरातील मालीपुरा येथील एक पुरुष व दोन महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत.

मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 86 होती. यापैकी 13 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे हा आकडा 73 वर आला. मात्र आज (दि.8) नव्याने 10 जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 83 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 130 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 पॉझिटिव्ह आणि 120 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 114 जण भरती आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 355 वर गेला आहे. यापैकी 259 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 29 नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 6389 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5927 प्राप्त तर 462 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5572 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.