अहवाल पॉझिटिव्ह येताच वृध्दाचा मृत्यू

सावंगी रुग्णालयात होते भर्ती

वर्धा,

जिल्ह्यात सतत कोरोना आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. मंगळवार, 7 जुलै रोजी दुपारी 75 वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मृतक सोमवारला सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आर्वी येथील रामदेवबाबा वार्डात राहणारे 75 वर्षीय वृध्द इसम घरीच घसरल्याने पडले होते. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने सोमवारी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवार, 7 जुलैला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने त्यांचे नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोबतच रामदेव बाबा वार्डात प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे. वृध्द इसमाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.