परतलेल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट

भंडारा,

सध्या देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्याने परदेशातून तसेच परजिल्हा, परराज्यात कामानिमित्त गेलेले गावचे नागरिक आपल्या गावात स्वगृही परतले आहेत. आता त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. शासनाने रोजगार उभारणीसाठी मदत करावी, अशी आर्त हाक परतलेल्या बहुतांश तरुणांनी शासनाला दिली आहे.

लाखनी तालुक्यातील अंदाजे १० ते १२ हजारांच्या जवळपास कामगार शेतमजूर युवक बाहेरुन तालुक्यात आले आहेत. विदेशातून बरेच व्यक्ती आाले आहेत. काही कुटूंबांनी महानगरातून देशाच्या विविध भागातून तथा परदेशातून कोरोनामुळे रोजगार संपुष्टात आल्याने गावाची वाट धरली. तालुक्यातील नागरिक मुख्यत: शेतीवर अवलंबून आहेत. रोजगार बंद झाल्याने ते गावाकडे परत आले असून त्यांच्यासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे.