पावसाने घराची भिंत पडली; जीवितहानी नाही

समुद्रपुर. (Samudrapur)  वर्धा जिल्ह्यात  (wardha district) असलेल्या समुद्रपूर तालुक्यात (Samudrapur Taluka) गेल्या काही दिवसांपासून रिमझीम (rain) पाऊसाने आंबेडकर वार्डातील विहार (Ambedkar ward vihar) जवळील विजय मेश्राम (Vijay Meshram) यांच्या घराची मागची भिंत पडून घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी घरातील सदस्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रिमझिम पाऊस असल्याने कच्चा घराला धोका निर्माण होत आहे. दोन दिवस पाऊस आल्याने आंबेडकर वार्डातील विजय मेश्राम यांचे घराची भिंत पडल्याने ते आता सम्पूर्ण घर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजय मेश्राम याने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांचे घर धोकादायक झालेल्या असल्याने पर्यायी जागा उपलब्ध करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी विजय मेश्राम यांनी केली आहे. घटनास्थळी नगराध्यक्ष गजानन राऊत (Mayor Gajanan Raut)  तलाठी दाते (Talathi Date) यांनी भेट दिली व अहवाल सादर केला आहे.