ग्रामिण रुग्णालयाला मिळणार रुग्णवाहिका

 पालकमंत्र्यांचे आश्वासन

पवनी,

येथील रुग्णालयात सात महिन्यांपासून  रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. पालकमंत्री सुनील केदार यांनी निवेदनाची दखल घेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

 पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात सात महिन्यांपासून रुग्णवाहिका नाही. त्यामुळे येथे येण्याकरिता गर्भवती महिला व रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यासाठी भिवापूर, लाखांदूर, पालांदूर आदी 30 किलोमीटर अंतरावरुन रुग्णवाहिका बोलाविली जाते. अपघातग्रस्त रुग्ण किंवा प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्ण त्रस्त आहेत. पालकमंत्री सुनील केदार पवनीच्या दौऱ्यावर आले असता विश्रामगृहावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली.

पालकमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेत लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी महेश नान्हे, तुषार भोंगे, इरफान शेख, तुषार भोगे, सौरभ तलमले व राकेश कुलरकर उपस्थित होते.