तालुका पुन्हा कोरोना मुक्त, 30 जणांना सुट्टी

लोणार,

कोविड सेंटरमधील 30 जणांना सुटी देण्यात आल्याने तालुका पुन्हा कोरोना मुक्त झाला आहे. सुलतानपुर येथील दोन रूग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सध्या स्थिती आटोक्यात आलेली दिसत आहे.

येथील अनुसुचित जाती व जमाती निवासी वसतीगृह येथे कोविड-19 आयसोलेशन वार्ड मध्ये 37 जणांना ठेवण्यात आले होते. यामध्ये पिता पुत्राचा अहवाल निगेटिव आल्याने त्यांना र  सुट्टी देण्यात आली आहे. यासोबत क्वारंटाईन केलेल्या 36 रूग्णांचे अहवाल सुध्दा निगेटिव आल्याने त्यांना सुध्दा सुट्टी देण्यात आली असल्याने तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त  झाला आहे.

सुलतानपुर येथील महिला पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तीना लोणार येथील कोव्हीड-19 सेटरला क्वारंटाईन करत स्वॅब घेण्यात आले. यामध्ये सुलतानपुर येथील 32 वर्षीय पुरूष व 9 वर्षीय त्याचा मुलगा असे दोघे पॉझीटीव आल्याने आरोग्य यंत्रणा संतर्क झाली. त्याच बरोबर लोणार शहरातील एक व्यक्ती लोणार येथे राहुन औरंगाबाद येथे गेला असता तो पॉझीटीव आढळला होता. याची दखल त्या व्यक्तीने स्वत: घेत लोणार येथील आपल्या  कुंटुबास क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. तपासणी करण्यास सांगीतले. त्याचा अहवाल  निगेटीव आल्याने तालुक्यासह शहराची चिंता मिटली आहे.  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फिरोज शहा, ठाणेदार रवींद्र देशमुख, रायटर चंद्रशेखर मुरडकर, सुधाकर काळे, सुरेश काळे, डॉ. कविता मापारी, अधिपारिचारक अरूण नागरगोजे , औषध निर्माता सूर्यकांत अंभोरे,विष्णू खरात, एएनएम संगीता गवई आदी कर्मचारी उपस्थित होते.