मर्डरची धमकी दिली : गुन्हा दाखल

भंडारा,

दिनेश भगतजील आकरे (36) रा. सनाया नगर केसलवाडा रोड भंडारा यांनी आरोपी ललीत नंदलाल बैस (45) रा. गोमती ट्रेडर्सच्या शेजारी खात रोड भंडारा, व दोन अनोळखी इसम यांचेकडून प्लॉट विकत घेतले होते. परंतु त्या प्लॉटची केस कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे, हे माहित पडल्यानंतर दिनेश आकरे यांनी आरोपीस पैसे परत मागीतले असता यातील आरोपी हे दिनेश आकरे याचे घरी येवून ‘‘तू केस मागे घे नाहीतर तुझा मर्डर करेल’’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राणे करत आहेत.