अखेर ‘तो’ वाघ जेरबंद

चंद्रपूर,

 ब्रह्मपुरी वनविभागातील तळोधी वनपरिक्षेत्रात दहशद पसरविणाऱ्या एनटी-१ वाघाला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. महिनाभरापासून धुमाकूळ घालून या वाघाने तळोधी परिसरात  तिघांचा बळी घेतला. या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश सकाळी देण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या आठ तासांत वन विभागाने वाघाला जेरबंद केले. बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आलेल्या वाघाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या या वाघाची प्रकृती उत्तम असून आता त्याची रवानगी गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्र येथे करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.