दोघांनी केली आत्महत्या

वर्धा : कारंजा व वर्धा पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या दोन घटनांत दोन युवकांनी जीवनयात्रा संपविली. वर्धेच्या आनंद नगर येथील आनंदनगर निवासी आकाश देविदास बलवीर (27) याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस येताच खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. मृतकाचा भाऊ सुजल बलवीर यांचे तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. दुस-या घटनेत बेलगाव येथील विनोद आत्राम (38) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावशिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गुरूवारी सकाळी ही घटना समोर येताच खळबळ उडाली. कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.