कोरोनाबाधित दोघांचा मृत्यु ; ३९ जणांची नव्याने भर

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ६५ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

बरे झालेल्या ६५ जणांना सुट्टी

यवतमाळ  : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ६५ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा आज (दि.१) मृत्यु झाला असून नव्याने ३९ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

 

शनिवारी मृत्यु झालेल्या दोन जणांमध्ये एक जण यवतमाळ शहरातील तेलीपुरा येथील ६० वर्षीय पुरुष आणि दुसरा व्यक्ती दिग्रस शहरातील वॉर्ड क्रमांक १ येथील ७० वर्षीय पुरुष आहे. जिल्ह्यात एकूण मृत्युची संख्या २९ झाली आहे.  आज पॉझेटिव्ह आलेल्या ३९ जणांमध्ये १९ पुरुष व २० महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील कोहीनूर सोसायटी येथील एक पुरुष, नेहरू चौक येथील एक पुरुष, तेलीपुरा येथील एक पुरुष, प्रजापती नगर येथील एक पुरुष व एक महिला, पिंपळगाव येथील एक पुरुष, गजानन नगर येथील एक महिला तसेच यवतमाळ शहरातील आणखी एक महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष तसेच पांढरकवडा शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद शहरातील बारी नगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील गोकूल नगर येथील दोन महिला, आर्णि शहरातील पाच पुरुष व नऊ महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील एक पुरुष व एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.

 

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ४५१ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात शनिवारी ४१ नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ४९२ वर पोहचला. मात्र दोन जणांचा मृत्यु झाल्याने व ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ६५जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४२५ आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १११५ झाली आहे. यापैकी ६६१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १०२ जण भरती आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १८००६ नमुने पाठविले असून यापैकी १४७३०  प्राप्त तर ३२७६ अप्राप्त आहेत. तसेच १३६१५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.