दोन ट्रक एकमेकांवर धडकले

  • दोघे जण गंभीर जखमी

मूर्तिजापूर. (Murtijapur)  अकोला जिल्ह्याजवळून  (Akola district) जाणारा राज्यमार्ग क्र. ६ वर शनिवारी रात्री झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

माहितीनुसार ट्रक क्र. एमएच-३२  बी-४५८९ आणि ट्रक क्र. एचआर-५५  एबी-८६३७  हे दोन्ही वाहन एकमेकांवर आमोरा-समोर धडकले. यामध्ये अब्दुल जमीर अब्दुल नबी (४०, रा. दारव्हा) आणि पीयूष बरलोटा (३९, रा. यवतमाळ) हे दोघेही जखमी झाले. आपातकालीन पथक (Emergency staff) प्रमुख विक्की गावंडे, रितेश चिनप्पा, सागर वांदे, मोहम्मद रिहान आणि शुभम यांनी जखमींना लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात दाखल केले. सूचना मिळताच शहर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर एका ट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस या घटनेचा तपास करीत आहे.