विदर्भात कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या पार 

नागपूर,

विदर्भात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाने बुधवारी दहा हजार रुग्णांचा आकडापार केला. यामध्ये २७५ रुग्णांनी आपले प्राण जमविले असून हा आकडा अत्यंत जिंताजन आहे. सध्याची स्थिती पाहता हा वेग अद्याप हा मंदावताना दिसत नसला तरी दिलासादायक बाब म्हणजे ६ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

विदर्भातील पहिला कोरोनाबाधित नागपुरात ११ मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली. नागपूरपुरता मर्यादित असलेला कोरोना यवतमाळ आणि नंतर अकोल्यात मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक दिवस एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांतील रुग्णसंख्येने शंभर, दोनशे, पाचशेचे आकडे पार केले. बुधवारपर्यंत नागपुरात सर्वाधिक ३,२९३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अकोल्यात २,२४६, अमरावती १,४४५ तर बुलडाण्यात ८३४ रुग्णांची नोंद आहे. सर्वात कमी १०८ रुग्ण वर्धा जिल्ह्यात आढळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या एसआरपीएफ आणि सीआरपीएफचे सुमारे २८६ जवान कोरोनाबाधित आढळले आहेत.