विद्यांचल द स्कूल, अकोटचा 100 टक्के निकाल

अकोट,

सीबीएसई दहावीच्या निकालात येथील विद्यांचल द स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवीत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक सत्र 2019-20 चीही शाळेची दहावीची पहिलीच बॅच होती. यामध्ये तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश संपादन केले. त्यामध्ये अनुश्री शरद पालखडे हिने 98 टक्के, राशी राजेश झुनझुनवाला हिने 97 टक्के तर ईशान संदीप जोशी याने 96 टक्के गुण मिळवीत शाळेला लौकिक प्राप्त करून दिला. विद्यांचल द स्कूल ही शाळा सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. उत्कृष्ट निकालासाठी शाळेचे व्यवस्थापक, प्राचार्य आणि शिक्षकांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थाध्यक्ष नरेश भुतडा, उपाध्यक्ष दिनेश भुतडा, सचिव सारिका भुतडा, शाळेच्या प्राचार्या डॉ. शैलजा त्रिवेदी, व्यवस्थापकीय प्रमुख प्रशांत विनायक आणि सर्व व्यवस्थापनाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.