विजय सरनाईक बल्लारपूरचे नवे मुख्याधिकारी

बल्लारपूर,

बदलीच्या प्रतीक्षेत असलेले बल्लारपूरचे मुख्याधिकारी विपीन मुग्धा यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आता विजय सरनाईक यांनी बल्लारपूरचे नवीन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

31 जुलै 2015 रोजी मुख्याधिकारी म्हणून नपमध्ये मुग्धा यांनी कार्यभार हाती घेतला. त्यानंतर जुलै 2018 रोजी मुग्धा यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. परंतु, त्यांची कार्यकुशलता बघून मागील राज्य सरकारने त्यांना कालावधी 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढविला होता. दरम्यान मुग्धा यांची बदली होणार तेवढ्यातच कोविड 19 महामारीचा संपूर्ण जगात उद्रेक झाला. मागील सहा महिन्यात एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ चार कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. हे मुख्याधिकारी मुग्धा यांच्या कार्यतत्परतेचेच लक्षण म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, कमी लोकसंख्येच्या भद्रावती तालुक्यात सुद्धा कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला आहे. मुद्धा यांनी त्यांच्या कार्यकाळात बल्लारपूर शहराला सौचमुक्त करण्यात तथा 3 स्टार रेटिंग मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. विपीन मुद्धा हे बल्लारपुरात सर्वाधिक कार्यकाळ 4 वर्ष 11 महिने 24 दिवस पूर्ण करणारे पहिले मुख्याधिकारी ठरले आहे.

विजय सरनाईक यांना 7 जुलै रोजी कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात येऊन बल्लारपूर शहरात 8 जुलै २०२० ला पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार विजय सरनाईक यांनी 8 जुलै रोजी बल्लारपूर मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

फोटो-10 chd 12