गाव समित्यांच्या माध्यमातून गावोगाव प्रबोधन मोहिम

अमरावती, 

कोरोना  विषाणूची  साखळी  तोडण्‍यासाठी कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीमार्फत ग्रामीण भागात नागरिकांच्‍या  घरोघरी जाऊन  सर्वेक्षण,  नोंदी घेवून प्रबोधन व जनजागृती  करण्‍यात येत आहे.   कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधनासाठी गाव समित्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व इतर विविध विभागाच्या सहकार्याने प्रबोधन मोहिम हाती घेण्यात आली आहे.

गावातील दुकानदार, व्‍यापारी, आस्‍थापना मालक मालाच्‍या खरेदी-विक्री साठी ज्‍यांना शहरात जावे लागते अशा दुकानांदारासाठी त्‍यांना काय दक्षता घ्‍यावी यासाठीचे स्‍टीकर त्‍यांचे दुकानाचे समोर लावण्‍यात येत आहेत.  त्‍याचबरोबर दुकानात येणा-या ग्राहकांना वस्‍तू खरेदी करताना दुकानाबाहेर शारीरिक अंतराचे पालन होण्‍याबाबत दुकानदार व नागरिकांमध्‍ये प्रबोधन करणे, वैयक्तिक स्‍वच्‍छता  पाळण्‍याची दक्षता घेण्‍यासाठी सूचनापत्राचे स्‍टीकर गावातील प्रत्येक  दुकानाचे बाहेर लावण्‍यात येत आहेत.

जनजागृती साहित्य वाटप

 सर्व ग्रामपंचातीना जनजागृतीचे साहित्‍य, बॅनर इत्‍यादीचे वाटप करण्‍यात आले असून,  सूचनापत्राचे स्‍टीकर,  दुकानदार व आस्‍थापना मालकांसाठी  सूचनापत्राचे स्‍टीकर, दुकानात येणार्या ग्राहकांसाठी सूचनापत्राचे स्‍टीकर, गृह विलगीकरण पाळणार्या व्‍यक्‍तींसाठी सूचनापत्र  इत्‍यादी   साहित्‍य पुरविण्‍यात आले असून  ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आणि सर्व क्षेत्रिय कर्मचारी यांचे  मार्फत जनजागृती करण्‍यात येत आहे.

ऑक्सीमिटरचा पुरविले

जनजागृती सोबत नियमितपणे गावातील नागरिकांची आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी आशांना प्‍लॅस ऑक्‍सीमीटर पुरविण्‍यात आले असून  त्‍याव्‍दारे नागरिकांच्‍या आरोग्‍याबाबतची प्राथमिक तपासणी करण्‍यात येत आहे. तपासणी दरम्‍यान लक्षणे आढळून येत असलेल्‍या नागरिकांची आरोग्‍य तपासणी तसेच कोविड सकारात्‍मक रुग्‍णांच्‍या संपर्कातील हायरिस्‍क कॉन्टॅक्‍ट नागरिकांची ॲन्‍टीजेन रॅपीट टेस्‍ट सुरुवात करण्‍यात आलेली आहे. ग्रामस्‍थांनी कोविड सकारात्‍मक रुग्‍णांच्‍या संपर्कात आल्‍यास माहिती आरोग्‍य यंत्रणेला कळवावी.