आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनास जाग

अखेर कृषी पंपाची विद्युत लाईन सुरू

आरमोरी,

कोरोना प्रादुर्भावात लॉकडाऊनमुळे रोजगाराचे माध्यम बंद पडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतीचा हंगाम सुरू झाला असताना विद्युत बिल न भरल्याचे कारण देत वैरागड येथील काही शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युत लाईन वीज वितरण विभागाद्वारे बंद करण्यात आले होते. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देताच वैरागड वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्याद्वारे कृषी पंपाची लाईन सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

     तालुक्यातील वैरागड परिसरातील शेतकरी कृषी पपांची पावसाळी धान रोवनीला सुरुवात केली असता, बिले भरले नसल्याचे कारण समोर करून लाईन बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी वैरागड वीज वितरण कपंनीचे शाखा अभियता यांची भेट घेऊन कृषी विद्युत लाईन सुरू करण्याची मागणी मागणी केली होती. मात्र, जोपर्यंत विद्युत भरणा होणार नाही तोपर्यंत लाईन सुरू करणार नाही, अशी धमकी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या रोवण्या थांबविणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता भोवरे यांची बदली करून शेतकऱ्यांची वीज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ववत सुरू करण्याची मागणी घेऊन जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा इशारा अधीक्षक अभियंता सुवसू गडचिरोली व उपविभागीय अभियंता सुवसू यांना दिला होता.

     यामुळे प्रशासनात खळबळ माजून आरमोरी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता बोबडे यांच्या मध्यस्थीने बुधवारी कृषी पंपाचे विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.