वर्धेत पुन्हा आढळले ८ कोरोना बाधित

  • ६ कोरोनामुक्त
  • ॲक्टीव रूग्ण ३५

वर्धा. गुरुवारी १८० जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला आहे. यातील ८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अन्य जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने १७८ जणांना आयसोलेशन मधून मुक्त करण्यात आले आहे. बाधितांमध्ये आनंदनगर येथील  ५५ वर्षीय महिला, सेवाग्रामची १८ वर्षीय युवती, रामनगर श्रीनिवास कॉलनी येथील ३९ वर्षीय महिला व ८ वर्षीय बालिका, आदर्शनगर येथील ५३ वर्षीय महिला, डॉ. झाकीर हुसैन कालोनी निवासी ५६ वर्षीय पुरुष, समुद्रपुर येथील २१ वर्षीय युवकासह अन्य एकाचा समावेश आहे.

गुरूवारी नव्याने  आयसोलेशनमध्ये  २९६ जणांना दाखल करण्यात आले आहे. २८१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आतापर्यत ९ हजार ६८४ जणांचे स्वॅब  तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील ९ हजार ११९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. तर, २६०  जणांचा अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यातील एकूण आकडा २६२ वर पोहोचला आहे. गुरूवारी ६ रूग्ण कोरोनामुक्त झाले  आहे. एकूण २१६  रूग्ण उपचारानंतर  बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३५ आहे. तर, ५ हजार २०४  जण गृहविलगीकरणात आहे. तर, २८९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहे.