इर्विन रुग्णालयात कोरोना योद्ध्याचे स्वागत

  • कोरोनामुक्त कर्मचाऱ्याचा सत्कार

अमरावती,

आरोग्य सेवा पुरविताना कोरोनाबाधित झालेल्या कोरोना योद्ध्याचा कोरोनामुक्तीनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वागत आणि सत्कार करण्यात आला. अरुणा आकाराम सरायकर या कोविड योद्धा रुग्णसेवा देताना संक्रमित झाल्या होत्या. कोविड रुग्णालयातील उपचारानंतर 14 दिवस होम क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण करून त्या पुन्हा कर्तव्यावर परतल्या आहेत. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड नं. 16 मध्ये कर्तव्यावर त्या हजर होताच त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अधिसेविका शिंदे, परिसेविका रामटेके, लोखंडे, दहेकर, ढाले, खांडेकर, पेंधाम, अधिपरिचारिका बांबर्डे, मनीषा गावंडे, महाजन, गुंडमवार, जामनेकर, देशमुख, पांडे, गावंडे, तबस्सुम, आकाश भालेराव, अनंत वायझाडे तसेच गणेश गडलिंग, हरिभाऊ वानखडे, राजू चारण, अभिजित पासरे आदी कर्मचारी हजर होते.

परिचारिकांनी वाढविले मनोबल

कोरोनाचा अहवाल आल्यानंतर मी घाबरून गेली होती. परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांनी फोन करून मला आधार दिला. सर्वांचे सहकार्य आणि योग्य उपचाराने मी बरी झाली. माझ्या परिचारिका भगिनींनी नातेवाईकांपेक्षा मला खूप मदत केली. कोरोनाला घाबरू नका, योग्य उपचार व मार्गदर्शन घ्या. आपण कोरोनावर विजय मिळवू शकतो, अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या परिचारिका अरुणा सरायकर यांनी दिली.