अपघातग्रस्तास बघताच महिलेचा  मृत्यू

. सेवाग्राम येथील घटना
. महिला सेलूची रहिवाशी

सेलू,

उपचाराच्या प्रतीक्षेत असताना  त्या ठिकाणी एका अपघातग्रस्त युवकाला घेऊन आले.परंतु हे दृश्य असह्य झाल्याने एका महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मृतक महिलेचे नाव  लक्ष्मी  वांदिले( 60) रा. वॉर्ड न 2 सेलू असे आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजता  सेवाग्राम रुग्णालयात घडली. मृतक लक्ष्मी वांदिले आज सकाळी नातू राहुल सोबत सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात   गेली होती. उपचाराच्या प्रतीक्षेत रांगेत असताना त्यावेळी त्या ठिकाणी रक्ताबंबाळ अवस्थेत एका अपघातग्रस्त  तरुणाला आणण्यात आले. हे विदारक दृश्य बघताच  लक्ष्मी  यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या खुर्चीवरून खाली पडून जागेवरच गतप्राण झाल्या. आज शुक्रवारी सेलू येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.