राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार(Schools Reopening In Maharashtra) असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरु होणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचेही गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एसओपी तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शाळेत उपस्थिती सक्तीची नाही आणि पालकांची संमती आवश्यक असल्याचे सांगितले.