पूर्व ईशान्य भारतातील सर्वात मोठा फ्लॉवर फेस्टिवल सिलिगुडीत सुरू झालाय. सिलीगुडी हॉर्टिकल्चरल सोसायटीतर्फे या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलचे यंदाचे ३७ वे वर्ष आहे. तथापि, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा सर्वच कार्यक्रमांचे स्वरुप बदलण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी तिकिटदर १० रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे. या फेस्टिवलमध्ये ६३ पुलांचे स्टॉल्स मांडण्यात आले असून फुलांच्या ७९ जातींचा यात समावेश आहे.