बोंडअळी आणि अतिवृष्टीमुळे विदर्भातला शेतकरी आधीच हवालदिल झाला असताना कापसाला मिळत असलेल्या तोकड्या हमीभावामुळे शेतकऱ्याचे पुरते कंबरडे मोडले आहे. एक एकर शेतीमध्ये कापसाचे उत्पादन घ्यायला किमान १८ ते २० हजारांचा खर्च येतो परंतु शासनाकडून मिळणारा हमीभाव हा फक्त पाच हजार आठशे रुपये आहे. हा हमीभाव आहे की थट्टा असा प्रश्न आता बळीराजाला पडला आहे.
Advertisement
Advertisement
