कोझिकोडे (केरळ) : केरळच्या कोझिकोडे येथील ९ वर्षाच्या मुलाने आपल्या पाककलेतील कौशल्याने सर्वांना चकित केले. हयान अब्दुल्ला याने अवघ्या एका तासात १७२ पदार्थ तयार केले आणि आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले. हयात इयत्ता ३रीत आहे. तोंडाला खरोखरच पाणी सुटेल अशा मसालेदार पनीर, रास्पबेरी जेली, मँगो लस्सी, पिस्ता दूध, टँगी चिकन, व्हेज इडली, स्पॅनिश आमलेट या पदार्थांचा त्यात समावेश होता.