लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर(Lords Match) २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक (World Cup)जिंकला होता. याच घटनेवर आधारित ‘83’ (83 Movie)हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh In 83) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘83’चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकूण ५९ सेकंदाच्या टीझरमध्ये १९८३ साली झालेल्या लंडनमधील लॉर्ड्स मैदानातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India Vs West Indies)सामना दाखवण्यात आला आहे. तसेच हा सामना पाहाण्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दी दिसत आहे.