खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘83’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर (83 Trailer Out)रिलीज केला आहे. ‘83’ चित्रपटात रणवीर सिंह(Ranveer Singh) कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.चित्रपट २४ डिसेंबर २०२१ ला(83 Release Date) हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मल्याळममध्ये ३डीमध्ये रिलीज होणार आहे.