विरारमध्ये(virar)एक विचित्र प्रकार समोर आला आहे. आपल्या आईच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या(suicide) करण्यासाठी हा तरुण विरार रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर झोपला. मात्र आरपीएफचे जवान प्रवीण यांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला(man`s life saved by RPF soldier) आहे. प्रवीण यांनी त्या तरुणाला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं आणि ट्रॅकपासून दूर नेलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.