महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.