मुंबई : सध्या महाराष्ट्रात पावसाने पुन्हा आपल्या जोर दाखवला असून जोरदार पावसानंतर मुंबई-गुजरात महामार्गावरील नायगाव वसई लगतच्या मालजीपाडा भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीस मोठा खोळंबा निर्माण झाला असून रोजच्या चाकरमान्यांना सुद्धा याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे एकीकडे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक ज्याम झाले आहे तर दुसरीकडे पावसामुळे व पाण्यामुळे वाहने बंद पडण्याचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळेच अजून मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाले त्या दृष्ट्या सकाळी सकाळी मुंबई-गुजरात महामार्गावर पहायला मिळाले.

जोरदार पावसानंतर मुंबई-गुजरात महामार्गावरील नायगाव वसई लगतच्या मालजीपाडा भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.