पुणे : पुण्यातील शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे धुमधडाक्यात त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. शालेय कर्मचाऱ्यांनी ढोल वाजवून आणि नृत्य सादर करत विद्यार्थ्यांना आश्चर्याचकित केले. कोविड -१९ च्या महामारीनंतर प्रदीर्घ काळानंतर आज विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.