बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा(Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टी(Ahan Shetty) ‘तडप’(Tadap) चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन जगतामध्ये प्रवेशासाठी सज्ज झाला आहे. ‘तडप’ चित्रपटामध्ये अहान तारा सुतारियासोबत (Tara Sutaria)रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट ३ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘तडप’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज(Tadap Trailer Release) झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले असून साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.