मुख्यमंत्री कार्यालयातील(CMO) ओएसडी सुधीर नाईक(Sudhir Naik) यांनी भंडारी सहकारी पतसंस्थेच्या(Bhandari Co-operative bank) मालमत्तांचा लिलाव आणि हस्तांतरण प्रकिया रोखण्याचा प्रयत्न फोन करुन केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आपण फोन केल्याचं नाईकांनी म्हटलं आहे.खरोखर मुख्यमंत्र्यांनी नाईकांना असं काही करायला सांगितलं आहे की नाईक स्वतःच्या मर्जीने न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु असलेल्या लिलाव प्रक्रियेत बाधा आणत आहेत असा सवाल भाजप आमदार अमित साटम(Amit Satam) यांनी विचारला आहे.