नारायण राणे(Narayn Rane Arrest) यांच्या अटकेमागे राजकीय दबाव(Political Pressure) असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अटकेवेळी रत्नागिरी(Ratnagiri) पोलीस अधीक्षक यांनी स्वत: आपल्यावर मोठा राजकीय दबाव असल्याचं सांगत आहेत, असं रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा एक फोनवरील संवाद साधतानाचा व्हिडिओही(Anil Parab Video) समोर आला आहे. त्यात ते पोलिसांना बळाचा वापर करण्याची सूचना देताना दिसत आहेत. अनिल परबांच्या या व्हिडिओवरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.