निर्माते-दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या नव्या चित्रपटाचं टायटल ‘अतरंगी रे’(Atrangi Re) असं काहीसं अंतरंगी आहे. अक्षय कुमार(Akshay Kumar), सारा अली खान (Sara Ali Khan)आणि धनुष(Dhanush) हे तीन कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट डिस्ने प्लस हॅाटस्टारवर (Disney Plus Hotstar)२४ डिसेंबरला रिलीज होणार आहे. ‘अतरंगी रे’ चित्रपटाचा ट्रेलर (Atrangi Re Trailer Release) नुकताच लाँच करण्यात आला आहे. सोशल मीडियाद्वारे अक्षय, सारा आणि धनुष यांचा फर्स्ट लुक शेअर केल्यानंतर ‘अतरंगी रे’च्या ट्रेलरमध्ये खऱ्या अर्थानं या तिन्ही कलाकारांचा अतरंगी अवतार पाहायला मिळत आहे.