जळगाव : श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या रविवार पासून खान्देशात कानबाईचा उत्सव साजरा केला जातो. आज जळगाव जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी कानबाई ची स्थापना करण्यात आली . कानबाई ला रोट चा नैवेद्य दाखवून हा नैवेद्य एकत्रित कुटुंबातील सदस्य ग्रहण करतात. त्यामुळे कानबाई चा निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्रित येत मोठ्या उत्साहात कानबाईचा उत्सव साजरा करतात . मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षीही कानबाईचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.