रविवारी उत्तराखंड (Uttarakhand) च्या नंदादेवी येथील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे धौलगंगा नदीला पूर आला. या पुरात अनेकजण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या ठिकाणी अद्यापही मदतकार्य सुरू आहे. या ठिकाणी एसडीआरएफच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले आहे.