नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने अनेकजण वेगवेगळ्या स्वरुपात त्यांना अभिवादन करताना दिसत आहे. चंदिगडमधील एका कलाकारानेे ३ डी पेंटिंगच्या माध्यमातून नेताजींनी आदरांजली वाहिली आहे. या चित्रामध्ये वापरण्यात आलेली फुलपाखरे म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे या चित्रकाराने म्हटले आहे.