दादर(Dadar) येथील शिवाजी मंदिर(Shivaji Mandir) नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर रंगकर्मीनी नटराज आणि रंगदेवतेची महाआरती(Mahaarti) करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नाट्यगृहे खुली करण्यासाठी रंगकर्मींनी अनोखे आंदोलन(Protest) करत नटराजाच्या पालखीची प्लाझा सिनेमागृहापर्यंत मिरवणूक काढली. यावेळी विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, मेघा घाडगे, संचित यादव, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर आदी रंगकर्मी उपस्थित होते.