अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच काही ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरल्याने ऊसाचे पीक आडवे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी शेतीला तळ्याचे स्वरूप आल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे प्रशासनाच्यावतीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी करत आहेत