कोरोनावर उपयुक्त ‘कोव्हिशिल्ड’ लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.