लुधियानामधील(Ludhiyana) बेकरीत चक्क चॉकलेटपासून गणपतीची मूर्ती(Ganesh Idol Made Of Chocolate) तयार करण्यात आली आहे. गेल्या ६ वर्षांपासून लुधियानामधील बेकरीमध्ये चॉकलेटपासून गणपतीची मूर्ती तयार केली जाते. बेलफ्रान्स बेकरीचे मालक हरजिंदर सिंग कुकरेजा यांनी सांगितलं की १० जणांनी मिळून १० दिवसात ही गणपतीची मूर्ती तयार केली आहे. या गणपतीचे विसर्जन दुधामध्ये होणार असून ते दुध आणि चॉकलेट गरीब मुलांना वाटले जाणार आहे.