आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास वर्सोवामधील(versova fire) यारी रोड येथे असलेल्या गॅस सिलेंडरच्या गोदामाला(gas cylinder godown fire) आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, १४ ते १५ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्यापही अस्पष्ट आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.