राज्यसभेचे सदस्य गुलाम नबी आझाद यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला. त्यावेळी संसदेच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनाही बोलण्याची संधी मिळताच त्यांनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. काँग्रेसने तुम्हाला पुन्हा येथे आणले नाही, तर आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांनाही हसू आवरता आले नाही.