दिग्दर्शक एसएस राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) चित्रपट ७ जानेवारी २०२२ ला जगभरातील सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट बाहुबली फ्रँचायझीपेक्षा मोठा प्रकल्प बनण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी अजय देवगण(Ajay Devgan), आलिया भट्ट(Alia Bhatt), जूनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण(Ram Charan) अभिनीत चित्रपटाची खास झलक (Glimpse Of RRR)प्रेक्षकांसमोर सादर केली आहे.