नवी दिल्ली : Whatsapp च्या प्रायव्हसी वरून रणकंदन माजलं आहे. या दरम्यान आता Google नेही आपल्या Chrome ची प्रायव्हसी मजबूत करणार असल्याची घोषणा केली आहे. Google ने आपल्या Chrome 88 मध्ये अनेक नवीन फीचर्स ॲड केले आहेत, जे युझर्सच्या प्रायव्हसीची पूर्णपणे काळजी घेणार आहेत. तर Google Chrome ने नवीन प्रायव्हसी फीचर मध्ये गुगल आपल्याला स्ट्राँग पासवर्ड ठेवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणार आहे, सोबतच जर पासवर्ड कमकुवत असल्यास आपल्याला अलर्टही जारी करणार आहे.