स्वच्छंदी आणि हरहुन्नरी अभिनेत्री मुक्ताचा आज वाढदिवस. १७ मे १९७९ रोजी पिंपरी चिंचवड येथे मुक्ताचा जन्म झाला. नाटक म्हणू नका किंवा मग मालिका... इतकंच नव्हे, तर अगदी चित्रपटांच्या माध्यमातूनही अभिनेत्री मुक्ता वर्बे हिनं प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे.