९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan)नाशिक (Nashik)येथे होत आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच साहित्य संमेलन होत आहे, त्यामुळे संमेलनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. दरम्यान साहित्य संमेलनाला काही तास उरले असताना संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती ‘नवराष्ट्र’ दिली आहे. येणाऱ्याला हे साहित्य संमेलन आपले वाटले अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे, असं साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले(Hemant Takle) यांनी सांगितले.