महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यापुढेही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र काम करुन विजय प्राप्त करतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख(anil deshmukh) यांनी व्यक्त केला आहे. आमचे सरकार कोसळेल, हे स्वप्न पाहणे भाजपने आता सोडून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.