सलमान खानचा(Salman Khan) ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ (Antim The Final Truth) हा चित्रपट २६ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटातील ‘होने लगा’ (Hone Laga Song Release)हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ‘होने लगा’ या गाण्यामध्ये आयुष शर्मा(Aayush Sharma) आणि महिमा मकवाना(Mahima Makwana)ही जोडी रोमान्स करताना दिसत आहे. जुबिन नॉटियाल यांनी हे गाणं गायलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. शबीना खान आणि उमेश जाधव यांनी या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे.